Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedअवैध जनावरांची वाहतुक; एका आरोपीसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध जनावरांची वाहतुक; एका आरोपीसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या आदेशानेव अप्पर पो अधीक्षक श्री नित्यांनद झा यांचे मार्गदर्शनाखाली चिचगड पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार काळेल ठाणे हद्धित अवैध धंद्याची माहिती काढून कारवाईकरणे कार्मी दिनांक 31 रोज बुधवार रोजी सकाळी 6.45 वा चिचगड पोलिस ठाणे हद्दीतील पाउलझोला टी पॉईंट मार्गावर नाकाबंदी केली असता टाटा कंपनीच्या ट्रक क्र. एम.एच.30 बि.डी. 2049 किमंत 8,00,000 लक्ष रुपये व 25 नग पाळीव जनारे किंमत 3,00,000 लक्ष रुपये असा 11,00,000 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्स करण्यात आला आहे. चिचगड पोलिसांना वाहनामध्ये मधे क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात अवैध रित्या जनावरांची वाहतूक होणार असल्यार्ची गोपनीय माहिती चिचगड पोलिस्टेसनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार काळेल यानां मिळाली असता सदर मिळालेल्या बातमी वरून चिचगड ठाणेदार यानीं पथकासह सापळा लावून कारवाई केली.

ट्रक वाहन क्रमांक एम.एच.30 बि.डी. 2049 मध्ये जनावराची चारापाण्याची सोय न करता निर्दयीपणे वाहतूक करताना चिचगड ठाणे हद्दीतील ठाण्याच्या छत्तीसगड ते नागपुर मार्गावरील चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील पाउलझोला टीपॉईन्टंवर आज बुधवार रोजी सकाळच्या 6.45 वाजता सुमारास आढळुन आला. सदर ट्रक दहा चाकी वाहणामध्ये तपासनी दरम्यान वाळिव जनावरे क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरून वाहतूक करताना आढळुन आले. या प्रकरणी ठाणेदार तुषार काळेल यानीं फिर्यादी वरून सदर ट्रक वाहन क्र.एम.एच.30 बि.डी. 2049 व आरोपी वाहन चालक रमेश मनोहर पोळकट वय 40 वर्षे राहणार मुर्तीजापुर जि. अकोला याचे विरुध्द कलम T1(1)(ड) , सहकलम प्रा.णि.वा.का.5 (अ),6,9, महा.पशुसंवर्धन अधि. 1976 सहकलम 119 मु.प.का, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिचगड पोलीसांनी सदर जनावरे ताब्यात घेऊन ट्रक वाहनासह असा एकूण 11,00,000/- रुपये चा माल जप्त केला आहे. सदरची कामगिरी मा.पोलिस अधीक्षक श्री निखील पिगंळे , अप्पर पोलिस अधीक्षक श्री नित्यांनद झा यांचे मार्गदर्शनाखाली चिचगड पोलीस ठाण्याचे सपोनि तुषार काळेल व यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments