Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedअवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हल्सची धडक

अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हल्सची धडक

थोडक्यात बचावले 70 प्रवाशी, घटनेचा पोलिसांना थांग पत्ताच नाही.
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गावर 28 डिसेंबर रोजी च्या पहाटे 5 वाजता दरम्यान भरधाव वेगात धावणारी लक्झरी ट्रॅव्हल्स ने अवैध रीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर ला मुख्य मार्गावर धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅकटरच्या ट्रालीचा संपूर्ण चेंदा मेंदा झाला असून ट्रॅव्हल्स ची देखील संपूर्ण तूटफूट झाली आहे.
या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. ही घटना साकोली ते कोहमारा मार्गावर असलेल्या ग्राम श्रीरामनगर परीसरात मुख्य मार्गावर घडली आहे. ट्रॅव्हल्स क्रमांक : सी. जी. 08 ए. डब्लू. 0054 असे असून दादा ब्रदर्श राजनांदगाव येथील ही ट्रॅव्हल्स आहे.
तर सौंदड येथील विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर मध्ये रेती भरली होती. हा ट्रॅक्टर श्रीरामनगर कडून रॉंग साईडने घुशून मुख्य मार्गावरील डीवायडर पार केले. तितक्यात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल ने ट्रॅक्टरला एका बाजूने धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर मधील वाळू संपूर्ण मार्गावर पसरली मात्र काही वेळच घटनास्थळावरून ट्रॅक्टर व ट्रॅव्हल्स हटविण्यात आली. विशेष म्हणजे या घटनेची पोलिसांना कुठलाही माहिती नाही. सदर बस मध्ये 60 ते 70 प्रवाशी सवार होते.
श्रीरामनगर येथे मुख्य महामार्गावर अशलेला डीवायडर तोडून प्रवाशी मार्ग तय्यार करण्यात आला आहे. जो अवैध आहे. याच ठिकाणी रेतीचे ट्रॅक्टर निघताना हा अपघात झाला. रायपुर पुणे रायपुर अशी ही ट्रॅव्हल्स प्रवास करते. नागपूर वरून रायपुर कडे जात असताना हा अपघात झाला आहे. सदर प्रकरणाला नोट पाणी देऊन दाबण्यात आल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहने धावतात मात्र तालुक्यातील वाळू माफिया अधिक पैसा कमविण्याच्या लालसेपोटी रात्रीला वाळूची चोरी करून ग्राहकांना पुरवठा करतात. श्रीरामनगर येथे वन विभागाच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करून शासनाच्या जागेवर बांधकाम करीत आहेत. या ठिकाणी रेती, मुरूम, मातीचा नियमित भरणा केला जाते त्या मुळे वाहनांचा डीवायडर वरून येथे अवागमन नियमित सुरू राहते.
सौंदड वरून श्रीरामनगर ते राष्ट्रीय महामार्ग रॉंग साईडने मार्ग पार केला जाते. त्या मुळे अश्या घटनांना चालना मिळत आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे. त्यांचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. हेल्मेट शक्ती, ओवर स्पीड, च्या नावाखाली कारवाई करून पोलिस प्रशासन वसुली करीत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. तालुक्यात शेकडो वाहने विना नंबरचे फिरताना दिसत आहेत. मात्र त्यावर कुठलीही कारवाई प्रशासन करीत नाही. त्या मुळे तालुक्यात अवैध कारभार चालविणाऱ्या माफियांना खुली छूट मिळत आहे. अता तरी प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का ? असा प्रश्न तालुका वाशियांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments