Thursday, December 5, 2024
Google search engine
Homeक्राइमआंतरराज्जीय मोबाईल चोरास पकडण्यात यश, अर्जुनी मोरगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..24 नग मोबाइल...

आंतरराज्जीय मोबाईल चोरास पकडण्यात यश, अर्जुनी मोरगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..24 नग मोबाइल जब्त..

 

गोंदिया। दिनांक 28/01/ 2023 रोजी अर्जुनी मोरगाव येथे शनिवारला असलेल्या आठवडी बाजारा मध्ये तक्रारदार हे बाजार करीत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल किंमत रुपये 5000/- चोरल्याची तक्रार या पोलीस ठाणे प्राप्त झाली होती. त्यानंतर ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 20/23 कलम 379 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद केला.

अर्जुनी-मोर पोलिसांनी भौतिक पुरावे, तांत्रिक तपास व गोपनीय बातमी दारांकडून प्राप्त माहिती वरून आरोपी नामे- शेख दिलदार शेख नसरुद्दीन वय 23 वर्ष राज्य- झारखंड याला ताब्यात घेवून गुन्ह्यात अटक केली.

नमूद गुन्ह्याचे तपास दरम्यान सदर आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोबाईल बाबत विचारपूस करून तपास केला असता आरोपीने फिर्यादीच्या मोबाईल सह एकूण 24 नग मोबाईल किंमती 2 लाख 51,000/- रूपयांचे आपले ईतर साथीदारांसह चोरी केल्याचे कबूल केल्याने आरोपी यांचेकडून गुन्ह्यात वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया अशोक बनकर, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक. विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्री. संभाजी तागड, पो. उप नि. संतोष गुट्टे, पोलीस अंमलदार पो. हवा. प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, राहुल चिचमलकर,श्रीकांत मेश्राम, सायबर सेल,तांत्रिक विभाग गोंदिया चे दीक्षित दमाहे यांनी कामगिरी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments