Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedआठ लाख मतदार घेणार मतदानाची शपथ

आठ लाख मतदार घेणार मतदानाची शपथ

गोंदिया : लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. हा उत्सव सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्याच्या उद्देशाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी व सर्वांनी मतदान करुन लोकशाही बळकटीकरणासाठी तसेच राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच स्वीप सेल गोंदिया यांच्या पुढाकाराने 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता एकाच वेळी जिल्ह्यातील संपूर्ण गावातील प्रत्येक मतदारांनी, बचतगट, समाजसेवी संस्था, सर्व शिक्षक, कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), जिल्हा परिषद कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी, सर्व महाविद्यालये, दवाखाने, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, आठवडी बाजार, नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या बाजारपेठा, बँक, पोष्ट ऑफिस अशा सर्वच कार्यालयामध्ये मतदान जागृतीकरीता मतदान शपथ घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वच मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी जिल्ह्यातील मतदारांना केले आहे. सदर उपक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्वच मतदारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, स्वीपचे नोडल अधिकारी शिखा पिपलेवार व डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments