गोंदिया : सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली द्वारा प्रायोजित वैनगंगा पांगोली सांस्कृतिक महोत्सव भंडारा-गोंदिया २०२३ अंतर्गत दिनांक ११ ते ३० ऑगष्ट च्या दरम्यान खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ठरविले आहे. त्याअनुषंगाने गोदिया लोकसभा क्षेत्रामध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
मणीपूर राज्यात मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना म्हणजे आदिवासी तरुणीवर महिलांवर सामूहिकरित्या बलात्कार करून नग्न धिंड काढण्यात आले व त्यांची हत्या करण्यात आली. हजारो घरांना आग लावुन जाळण्यात आले. लाखो लोक बेघर झालेत असे लाजीरवाणे, घृणास्पद अमानविय कृत्य देशात विविध स्तरावर आदिवासींवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत. यांवर भारत सरकार निष्क्रीय आहे. देशाची राष्ट्रपती आदिवासी असतांनी या विषयावर एकही शब्द काढत नाही. एक आदिवासी संघटन म्हणून आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की आम्ही देशाचे नागरीक आहोत की नाही ? पंतप्रधानाच्या अभिभाषनामध्ये आमच्या समाजाला कुठल्याही प्रकारचा दिलाचा दिला नाही. ९ ऑगष्ट आम्ही जागतीक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो. यावर्षी आम्ही भारतातील परंपरागत आदिवासी नृत्य व आदिवासी संस्कृती यांचे दर्शन पडवणारे विविध कार्यक्रम सादर न करता मणिपूर घटनेवर भारत सरकारच्या उदासीन वागणुकीबद्दल निषेध नोंदविला.
गाव, तालुका ,जिल्हा व राज्य पातळीवरील घृणास्पद कार्य करणारे आरोपी मोकाट असुन अजुनपर्यंत शासन-प्रशासन तर्फे गरुणास्पद घटना थांबिविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठोस पावले उचलत नसल्यामुळे आदिवासी समाजामध्ये आक्रोश निर्माण झालेले असतानां सुद्धा वरील प्रमाणे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आदिवासी समाजाच्या जखमांवर मीठ चोळून त्यांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे कार्य होत आहे.
त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या आदिवासी सांस्कृतिक महोत्सव जोपर्यन्त मणिपूर राज्यातील घृणास्पद घटना घडून आणणाऱ्या आरोपी यांना सामुहिकरित्या फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत असे काही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येउ नये. आज मा. खासदार सुनिलजी मेंढे यांना रेस्ट हाऊस गोंदिया येथे प्रत्यक्ष भेटून ऑल इंडिया आदिवासी पिपल फेदरशन गोंदिया च्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना ऑल इंडिया आदिवासी पीपल फेडरेशनचे अध्यक्ष करण टेकाम , गोंडवाना मित्र मंडळ अध्यक्ष घनश्याम तोडसाम, नीलकंठ चीचाम विद्यार्थी संघ गोंदिया, संगीता पुसाम महासचिव, प्रा . दिशा गेडाम , अतुल सतदेवे संविधान मैत्री संघ गोंदिया, ललिता ताराम, दिलेश्वरी मरस्कोल्हे, तुष्मा तोडसाम, मनोहर मडावी, ममता नागभिरे, आर सी नागभिरे , डी जी कोल्हारे, आर आर कडाम, विक्रम बेहरे, अर्जुन रोहनकर, कार्तिक भिमारे, रामकृष्ण पंधरे, रोहित बोरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम (गोंडीनृत्य) रद्द करण्यात यावे : करण टेकाम
RELATED ARTICLES