Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedआधार लिंक सुविधा गावातील पोस्टातच उपलब्ध

आधार लिंक सुविधा गावातील पोस्टातच उपलब्ध

27 हजार लाभार्थ्यांची बँक खाती आधार लिंकविना
गोंदिया : पंतप्रधान शेतरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात 2 हजार रुपये या प्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्याचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी आता पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी 27 हजार 200 लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात तेराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आयपीपीबी मार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांचे मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. इंडिया पोस्ट पेयमेंट बँकतर्फे गावातच ही सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांचे खाते उघडले गेलेले नाही त्यांचे खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते बँक खाते आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाईल. यासाठी राज्याच्या इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील पोस्टमास्तर या लाभार्थीना संपर्क करून इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बँक खाती सुरु करतील. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत 1 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेयमेंट बँकेमध्ये बँक खाते सुरु करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. या सेवेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोंदिया डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक आशिष बनसोड यांनी केले आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments