Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedआधी अतिक्रमण हटाव- राष्ट्रवादीची मागणी

आधी अतिक्रमण हटाव- राष्ट्रवादीची मागणी

नवीन व्यापारी संकुलाच्या लोकवर्गणीचे फेरविचार करा
न पं मुख्याधिकाऱ्यांना देवरी तालुका राष्ट्रवादी कांग्रेसचे निवेदन
गोंदिया : देवरी नगरपंचायतच्या वतीने बांधण्यात येणा-या पंडित दिनदयाल उपाध्याय व्यापारी संकुलनाच्या बांधकामाकरीता घेण्यात येणा-या लोकवर्गणी बाबद फेरविचार करा व देवरी येथील बाप्पा वस्तीग्रुहाला लागून असलेल्या जि.प. शाळेच्या जमिनीवर बेकायदेशीर केलेले अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे या मागणीचे निवेदन देवरी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (ता.१२जून ) रोजी देवरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रणय तांबे आणि देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, गोंदिया यांना सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात देवरी नगरपंचायत हद्दीत नव्याने बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलनाला “पंडित दीनदयाल उपाध्याय व्यापारी संकुल” असा उल्लेख आहे. या सोबत देवरी शहरात आठ जागी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. या व्यापारी संकुलनाला गोंडवाना राणी दुर्गावती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, क्रांतिसुर्य बिरसा मुंडा, डॉ. जाकीर हुसेन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रोहीदास महाराज, संत जगनाडे महाराज, असे अनुक्रमे नाव देण्यात यावे. या व्यापारी संकुलनाच्या बांधकामासाठी संबंधीत विभागाकडून परवानगी घेतली आहे का ? बांधण्यात येणा-या या संकुनाच्या जागी काही लोकांनी पूर्वीपासून अतिक्रमण केले आहे. आणि या ठिकाणी धंदाकरून आपले व आपल्या कुटूंबाचे पोट भरत आहेत.त्यांना या व्यापारी संकुलनासाठी तळमजला ९ लक्ष व पहिल्या मजला ६ लक्ष रूपये एवढी मोठी रक्कम लोकवर्गणीची देणार कुठून. आजच्या परिस्थितीनुसार फुटपाथ वाले गरीब धंदेवाले लोक ऐवढी मोठी रक्कम एकमुस्त भरू शकत नाही. तरी नवीन व्यापारी संकुलनाच्या लोकवर्गणीचे फेर विचार करावा आणि या बांधकमाचे नव्याने अंदाजपत्रक तैयार करून त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार लोकवर्गणी घेण्यात यावे. त्याच प्रमाणे देवरी येथील जि.प.कन्या शाळेच्या पटांगणावरील जागेवर काही लोकांनी कंपाऊंड वाल तोडून अतिक्रमण केले असून सध्या बांधकाम सुरू आहे. ते बेकायदेशीर बांधकाम त्वरित तोडण्यात यावे. तरी या जनहिताची बाब लक्षात घेवून सदर बेकायदेशीर असलेल्या अतिक्रमण जागेवरील बांधकाम त्वरीत हटविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली असून येत्या सात दिवसात आमच्या मागणीवर काय कार्यवाही केली या बाबद माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावे. अन्यथा या विषयाला धरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही देण्यात आला आहे.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात रा.कां. चे विधानसभा अध्यक्ष रमेश ताराम, देवरी तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, तालुका महिलाध्यक्ष पारबताबाई चांदेवार, नगर सेवीका हिना टेंभरे, माजी नगराध्यक्ष सुमनताई बिसेन, माजी पं.स. सदस्य अर्चनाताई ताराम, सुजीत आग्रवाल, भैय्यालाल चांदेवार, गोपाल तिवारी, शहराध्यक्ष सचिन भांडारकर, रवाकांत बडवाईक, शर्मिलाताई टेंभूर्णिकर, कैलास टेंभरे, अजय आचले, रंजन मेश्राम, रविरंजन मेश्राम, नरेश कुंभरे, मिणा कुंभरे, प्रभाताई चौधरी, लक्ष्मी मेश्राम, पुष्पा मस्के, सत्यवान देशमुख, विजय दुधकावरां, तेजराम भलावी, मनोहर नागदेवे, नरेन्द्र श्रीभाद्रे, आनंदराव चौव्हाण, नईमभाई, आनंदराव शिवणकर, अनिल तांडेकर, विजय बारसागडे, भोजराज बिंझाडे, विंदा अंबादे यांच्यासह देवरी शहरातील रा.कां.पक्षा चे कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments