जिला आरोग्य अधिकार्याला निवेदन
गोंदिया, ब्यूरो. गोंदिया शहरात खुप ठिकाणी आपला दवाखाना आपल्या विभागामार्फत सुरू करण्यात आलेले आहेत. परंतु सदर दवाखान्यामध्ये वैद्यकीय सुविधांचा अभाव खुप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दवाखान्यात नियमितपणे रुग्णांची तपासणी होत नाही व पॅथालॉजी लॅबची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना रुक्त तपासणी तसेच इतर तपासण्याकरिता इतरत्र ठिकाणी भटकावे लागत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना रक्त तपासणीकरिता आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. आपला दवाखानामध्ये रुग्ण तपासण्या नियमित व्हाव्यात, याकरिता संबंधित दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांना योग्य ते आदेश निर्गमीत करावे, तसेच सदर दवाखान्यात पॅथालॉजी लॅबची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी गोंदिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिला प्रमुख पंकज एस. यादव यांनी केली आहे. या संदर्भात जिला आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
आपला दवाखान्यात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्या : पंकज यादव
RELATED ARTICLES