सात कोटी ६० लाखाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
गोंदिया : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून आज देवरी तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सदस्य उषा शहारे होते. गडेगाव येथे पाच लाख निधीतून समाज भवन, मोहगाव येथे पाच लाख रुपये निधी खर्च करून वाचनालयाची इमारत तर प्रत्येकी दीड कोटी निधीतून भर्रेगाव- राजमडोंगरी रस्त्यावर तीन पूल आणि पालांदूर गणूटोला रस्त्यावर दोन पूल उभारल्या जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे भूमिपूजन श्री. कोरोटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य राधिका धरमगुडे,पंचायत समिती सदस्य भारती सलामे, राजेश चांदेवार,गडेगावच्या सरपंच संगीता कुंभरे, उपसरपंच ओमप्रकाश सलामे, हरिप्रसाद मडावी, मीना मडावी, प्रवीण कोचे, प्रभा भैसारे, गिता कुंभरे, बळीराम कोटवार,भुवन नरवरे,प्रशांत कोटांगले, सुदाम भोयर, छगनलाल मुंगणकर, संदीप मोहबीया, सचिन मेळे, कैलास घासले, नरेश राऊत, कलिराम किरसान, ग्यानशिंग अरकरा, ईश्वरदाश अरकरा, बुधनदाश अरकरा, ईश्वर मडावी, भवरशिंग पडोटी, झाडू उईके आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार कोरोटेंच्या हस्ते देवरी तालुक्यात विविध कामांचे भूमिपूजन
RELATED ARTICLES