महसूल सप्ताह अन्वये एक हाथ मदतीचा उपक्रम अंतर्गत शिलापूर येथे धनादेश वितरण.
गोंदिया. देवरी तहसील कार्यालय देवरीच्या वतीने महसूल सप्ताह अन्वये एक हाथ मदतीचा ह्या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील शिलापूर येथे मागील आठवड्यात कैलास राऊत यांची पत्नी ललिता कैलास राऊत वय ३३ ही आपल्या शेतात रोवना करीत असतांनी विज पडून मृत्यू पावल्या त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजने अंतर्गत आर्थिक मदत व्हावी म्हणून ४ लाख रूपयाचे मंजूर धनादेश सोमवार ( ता. ०७ ऑगस्ट) रोजी मृतकाचे पती कैलास राऊत यांना या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यात सविस्तर असे की, मागील आठवड्यात शिलापूर येथील रहवासी कैलास राऊत यांची पत्नी ललिता कैलास राऊत ही आपल्या शेतात रोवना करीत असतांनी वीज पडून मृत्यू पावल्या त्याकरिता त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांचे प्रकरण जलद गतीने पूर्ण करून ४ लाख रुपयाचे मंजूर धनादेश आज सोमवार रोजी मृतकाचे पती कैलास राऊत यांना या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी नायब तहसीलदार अनिल पवार, मंडळ अधिकारी श्री ब्राम्हणकर, तलाठी श्री बांते, कार्यालयीन कर्मचारी सौ. वाढई, शिलापूरचे सरपंच गरिबा टेंभुरकर, पोलीस पाटील रामदास वाघमारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संपत रहिले, माजी अध्यक्ष गोपाल भोयर, माजी पं. स. सदस्य ओमराज बहेकार, कॉंग्रेस कार्यकर्ता संदीप मोहबिया, ग्रा.पं. सदस्य नरेश राऊत, सुभाष मेळे यांच्या सह गावातील नागरिक व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते.
आमदार कोरोटे यांच्या हस्ते मृतकाच्या कुटुंबाला धनादेश वाटप
RELATED ARTICLES