Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedआमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने १५ वर्ष जुने भूभाड्याचे धनादेश अखेर वितरित

आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने १५ वर्ष जुने भूभाड्याचे धनादेश अखेर वितरित

रजेगाव काटी उपसा सिंचनाचे वितरिकेतील २४३ प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय – २२.८४ लक्ष निधीची तरतूद
गोंदिया : “शेतकऱ्यांच्या शेतातील एका काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये” असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मावळ्यांना शिकवण दिली होती. इथे तर शेतकऱ्यांची शेतजमीन कलाव्यामध्ये गेली आणि त्याच कित्तेक वर्ष मोबदला सुद्धा मिळाला नाही. हा शेतकऱ्यांवरील अन्याय आपल्या महाराष्ट्रात होवू देणार नाही. ही महाराष्ट्राची भूमी आहे यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल आणि न्याय मिळवून दिला जाईल असे प्रण घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. तालुक्यातील अनेक गावांना शेतीसाठी पाणी पुरविणाऱ्या रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेमुळे मुरपार, मरारटोला, सिरपूर, कलारटोला, कोचेवाही, चारगाव, गोंडीटोला येथील २४३ शेतकऱ्यांचे शेतजमीन बाधित झाले होते. शिरपूर आणि बघोली या वितरिकेत अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन विदर्भ पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्प विभागाच्या वतीने सन २००८ पासून २०११ पर्यंत कालव्यासाठी शेतजमीन वापरली. कालव्याचे कार्य पूर्ण झाले परंतु १५ वर्ष लोटूनही शेतकऱ्यांना मात्र भूभाडे मिळाले नव्हते. अनेक शेतकऱ्यांनी कालव्यात गेलेल्या जमिनीचे पैसे मिळणार ही अपेक्षाच सोडली होती. परंतु आमदार विनोद अग्रवाल यांच्या पर्यंत सदर प्रकरणाची माहिती काही शेतकऱ्यांनी पोचवली. यावर शासनाकडे पाठपुरावा करत आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित प्रकल्पग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवून दिला. आज (९) रोजी कार्यकारी अभियंता , मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया यांच्या कार्यालयात आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. मागील १२ वर्षापासून प्रलंबित असलेला विषय अखेर मार्गी निघाला आणि उशिरा का होईना पण शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भूभाडे मिळवून दिल्याने शेतकऱ्यांनी आमदार अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भूभाडे निधी वितरण कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता ए. आय. पाटील, सहाय्यक अभियंता एस.डी. मडकाम, शाखा अभियंता आर. जे. भैरव, सहाय्यक अभियंता ए. एस. हिरापुरे, आर.जि. कापगते, सहाय्यक आर.सी. नागपुरे, वरिष्ठ लिपिक आर. डी. राहंगडाले, आरेखक आर.आर. सेरेकर व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments