गोंदिया : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाºया 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाºया शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. गोंदिया जिल्ह्यात 145 शाळांमध्ये 1000 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत होणाºया प्रवेश प्रक्रियेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये नि:शुल्क प्रवेश घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होते, याबाबत पालकांमध्ये उत्सुकता असते. यंदा ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. शाळांनी नोंदणी पूर्ण केल्यानंतरच पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या नामांकित 145 शाळांमध्ये 1 हजार विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.
आरटीई अंतर्गत 145 शाळांमध्ये हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
RELATED ARTICLES