गोंदिया : आमदार विजय रहांगडाले यांच्या द्वारे 11 फे ब्रुवारी रोजी आरोग्य महाशिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते हत्तीरोग निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अविष्कार हार्ट फाउंडेशनची विधीवत घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले होते. उद््घाटक म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे होते तर विशेष अतिथी म्हणून सेंट्रल हॉस्पिटलचे प्रमुख एल.एल. बजाज उपस्थित होते. यावेळी शिबिराचा लाभ सर्व गरजूंनी घ्यावा, असे आवाहन आमदार रहांगडाले यांनी केले.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219