Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedआ. विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाला दिव्यांगांना साहित्य वाटप

आ. विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाला दिव्यांगांना साहित्य वाटप

गोंदिया : गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आपला 55 वा वाढदिवस दिव्यांगांना विविध साहित्य वितरण करुन साजरा केला. दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुकर व्हावे, यासाठी आ. विनोद अग्रवाल गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवित आहेत. यात दिव्यांगाच्या आरोग्य तपासणीसह साहित्य वाटप करीत आहे.
आपल्या वाढदिवसही ते दिव्यांगांना साहित्य वाटप साजरा करतात. यातंर्गत 4 जून रोजी त्यांनी आपला 55 वा वाढदिवस पोवार सांस्कृतिक भवनात साजरा केला. या कार्यक्रमात 103 अपंगांना बॅटरीवर चालणारी ई-रिक्षा देऊन मिठी मारली. तर हातपाय नसलेल्या शेकडो अपंगांना कृत्रिम हातपाय बसवून त्यांच्या आयुष्यात नवीन आनंद देण्याचे काम केले. प्रसंगी आ. अग्रवाल म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे. आज बॅटरीवर चालणारी रिक्षा आणि कृत्रिम हातपाय मिळाल्यानंतर जो आनंद दिव्यांगांमध्ये दिसतो, तोच आनंद माझ्यात उर्जेचा स्रोत निर्माण करत आहे. दिव्यांगांना मदत करणे हे ईश्‍वरी कार्य असून, हे काम मी आयुष्यभर करत राहीन. दरम्यान, आ. अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हिरवळ बहुउद्देशीय संस्था, तृप्ती फाऊंडेशन आणि विनोद अग्रवाल मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना 1100 रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील हजारो चाहत्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments