गोंदिया : नुकत्याच गोंदिया येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात अर्जुनी मोर. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथ. शाळा, इंजोरीने प्रथम क्रमांकाचे तीन पारितोषिक पटकाविले. अगदी 23 पटसंख्या असलेल्या इंजोरी शाळेच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अतिशय छान प्रकारे पार पडले. त्यात अनेक प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. इंजोरी येथील विद्यार्थ्यांनी ‘गावाचा विकास देशाचा विकास’ ही अतिशय सुंदर नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून प्राथमिक गटात ‘प्रथम क्रमांक’ पटकाविला. तसेच ‘समूहगीत गायन’ व ‘एकलगीत गायन’ यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. अशाप्रकारे एकूण तीन प्रकारांमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. मुख्या. विठोबा रोकडे व सहाय्यक शिक्षक लाखेश्वर लंजे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे कार्यक्रम उत्साहाने सादर केले. या यशाबद्दल जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, रवींद्र खोटेले, मोरेश्वर मेश्राम, संजय परशुरामकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक बंधु-भगिनी व गावकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. पालक व गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
इंजोरी प्राथ.शाळेने पटकावीले प्रथम क्रमांकाचे तिन जिल्हास्तरीय पुरस्कार
RELATED ARTICLES