गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे.यापुर्वी १३ मार्च २०२२ पासून या विमानतळावरून इंदूर – गोंदिया – हैदराबाद प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली होती.मात्र अवघ्या सहा महिन्यातच ही सेवा बंंद पडली.तेव्हापासून या विमानतळावरुन पुुन्हा प्रवासी सेवा सुुरु करण्याकरीता प्रयत्न सुरु होते.अखेर माजी केंंद्रीय विमान वाहतूक मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने येत्या 1 डिसेंंबरपासून इंडिगो एअरलाईन्स गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन प्रवासी वाहतूक करण्यास सज्ज् झाली आहे.त्याकरीता इंडिगोच्यावतीने तिरुपती- हैद्राबाद-गोंदिया या मार्गाची आधीच घोषणा करण्यात आली होती.त्यात इंडिगोच्यावतीने गोंदियावासियांना पुन्हा दिवाळी भेटच्या स्वरुपात गोंदियावरुन व्हाया हैद्राबाद मार्गे पुणे व मुंबई सेवा सुध्दा 1 डिसेबंरपासूनच सुरु करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यादृष्टीने वेळापत्रक सुध्दा तयार करण्यात आले आहे.
इंडिगो कपंनीने विमानतळाची पाहणी केली असून करुन कंपनीने 17 नोव्हेंबरला नाॅनशेड्युल प्रायोगिक तत्वावर हैद्राबाद ते गोंदिया असा प्रवास 72 आसनी विमानाने करुन विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक पुर्ण केले.बिरसी विमानतळावर या अनुषंगाने कर्मचारी भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून तिकिट विक्रीलाही सुरवात झाली असून बिरसी विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे विमान 1 डिसेबंरला ‘टेक ऑफ’ मुंबई पुणेच्या दिशेने हैद्राबाद मार्गे उड्डाण करणार हे निश्चित झाले आहे.सोबतच गोंदियाच्या बिरसी विमानतळावर RCDU टीमद्वारे DVOR उपकरण 22 नोव्हेंबरला बसवण्यात आले.या यत्रांव्दारे विमानाच्या वैमानिकाला विमानतळावरुन विमान उडवितांना व उतरवितांना योग्य रुट मार्गदर्शन मिळणार आहे.या यंत्रामुळे पायलटला पिन पाॅईंट करण्यात मदत मिळणार आहे.
बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून पुणे व मुंबईकरीता विमानसेवेची सातत्याने मागणी होती.गोंदियातील विद्यार्थी व नोकरीच्या निमित्ताने ये जा करणारे संख्या हैद्राबाद पेेक्षा पुण्यात अधिक असल्याने गोंदिया पुणे सेवा सुरु करण्यासोबतच हैद्राबाद इंदुर असा मार्ग हवा अशी मागणी केली जात होती,त्या मागणीच्या अनुषगांने इंडिगो एअरलाईंसने आपले वेळापत्रक तयार केले आहे.पुण्यावरुन गोंदियाकरीता सकाळी 6 वाजता व मुंबईवरुन सकाळी 8 वाजता हैद्राबाद मार्गे विमान झेप घेईल व दुपारी 12.35 ला गोंदियात दाखल होईल. पुणे व मुंबईला जातांना मात्र प्रवाश्यांना हैद्राबाद विमानतळावर मुंबईकरीता दीड तास व पुण्याकरीता सात तास बसावे लागणार आहे.