Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedइन्व्हर्टर, बॅटरी, केबल वायर, चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांचे जाळ्यात

इन्व्हर्टर, बॅटरी, केबल वायर, चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांचे जाळ्यात

31,600/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत : दोन गुन्ह्यांची उकल

गोंदिया : पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन ला दाखल चोरी, घरफोडी चे अउघड गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करून गुन्हे उघड करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले आहेत.

मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना मार्गदर्शनात पो.नि.श्री.दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनात स्था. गु. शां. येथील पोलीस पथक जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन ला दाखल अउघड गुन्ह्यातील गुन्हेगारांची माहिती घेवून चोरी, घरफोडी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची शोध मोहीम राबवित आहेत. या अनुषंगाने दिनांक 10/03/2024 रोजी स्था.गु.शा. पथक हे गुन्हेगारांचा शोध करीत असताना पथकाने गोपनीय बातमीदार कडून प्राप्त खात्रीलायक माहिती च्या आधारे चोरी घरफोडीचे गुन्हे करणारा संशयित ईसंम नामे.-बुध्दसेन मयकुलाल चक्रवर्ती वय 20 वर्षे रा. किडांगीपार तालुका  आमगाव जिल्हा गोंदिया यास ताब्यात घेण्यात आले.

पोलीस ठाणे आमगाव येथील अभिलेखावर दाखल अप. क्रं. 88/2024 कलम 454, 457, 380 भादंवि., तसेच अप. क्र. 104/ 2024 कलम 379 भादंवि अन्वये चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यासंबंधाने ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितास विश्वासात घेवून विचारपूस चौकशी केली असता बुधसेन चक्रवर्ती याने दोन्ही चोरी घरफोडी चे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपीच्या ताब्यातून नमूद दोन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेली मालमत्ता 1) किंमती 20,000/- रुपयेचे 1 नग Polycab solar grid TIE inverter 5000w with RMS Sola Device, Modal NO. PSIS-5K-SM2, 2) किमती 8000/- रुपयाचे- पॉलीकॅब कंपनी चा काळ्या रंगाचा केबल वायर बंडल, 3) 3600/-रुपये किमती ची 1 नग जुनी वापरती EXIDE कंपनीची लाल रंगाची बॅटरी असा एकुण 31,600/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. आरोपी बुद्धसेन चक्रवर्ती रा. किडांगीपार* यास मुद्देमालासह आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्ने, स.फौ. अर्जून कावळे, पो.हवा. विठ्ठल ठाकरे, भुवनलाल देशमुख, दुर्गेश तिवारी, पो.शि. हंसराज भांडारकर, चा.पो.शि.घनश्याम कुंभलवार, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments