१६ विभागामध्ये सुरु होणार ऑनलाईन प्रणाली
गोंदिया : राज्य शासनाच्या कामकाजात संगणकाचा अधिकाअधिक वापर करून शासकिय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्ताऐवज व माहिती सुरक्षित, त्वरेने व जलदगतीने प्राप्त होवून निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शासनाच्या विभागामधील शासकिय कामकाजात ‘ई-ऑफीस प्रणालीचा’ प्रभावीपणे वापर या विषयी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथील १६ विभागामध्ये ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
नागरिकांना जलद व विना अडथळा सेवा प्राप्त व्हाव्यात असे शासनाचे आदेश आहेत. ‘ई-ऑफीस प्रणाली’ ही ऑनलाईन सेवा असून याद्वारे दस्ताऐवज व माहिती सुरक्षित, त्वरेने व जलदगतीने प्राप्त होवून निर्णय प्रक्रिया सुलभ होणार आहे. या प्रणालीचे २० एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात देखील सदर प्रणाली सुरू करण्याच्या दृष्टीने वेगाने काम चालू आहे. २० एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण मास्टर ट्रेनर निमेश पाठक, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनिकर यांनी तांत्रिक प्रशिक्षण दिले. सिनिअर नेटवर्क इंजिनियर अविनाश सिंग, विशाल बागडदे व एन.आय.सी. विभागातील कर्मचारी यांनी यावेळी समन्वय साधला.
‘ई-ऑफीस प्रणाली’च्या प्रभावीपणे वापरासाठी तांत्रिक प्रशिक्षण
RELATED ARTICLES