31 जानेवारीपर्यंत धान खरेदी केंद्रावर नोंद करावी
एनईएमएल पोर्टलवर पूर्ण करावी नोंदणी
गोंदिया : ज्या शेतकºयांची ई-पीक पाहणी न झाल्याने धान खरेदी केंद्रावर नोंद झाली नाही, त्यांनी 31 जानेवारीपर्यंत धान खरेदी केंद्रावर जाऊन खरेदीसाठी नोंद करून घ्यावी. ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकºयांच्या याद्या तहसीलदारांनी प्रमाणित करून धान खरेदी केंद्रावर पाठवल्या आहेत. त्या आधारे शेतकºयांनी 31 जानेवारीपर्यंत एनईएमएल पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
विविध कारणांमुळे धान उत्पादक शेतकºयांपैकी काही शेतकºयांची ई-पीक पाहणी न झाल्यामुळे पिकपºयाची खसºयावर नोंद न झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांना अधिकृत धान खरेदी केंद्रांवर धान विक्री करता येत नसल्याचा मुद्दादेखील लोकप्रतिनिधींद्वारे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यानुसार हा मुद्दा अन्न, नागरी पुरवठाविभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर विभागाने नोंदणी करण्याची तारीख 31 जानेवारीपर्यंत वाढवून दिलेली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदारांना निर्देश देण्यात आले होते व त्यानुसार तहसीलदारांनी तलाठ्यांकडे ई-पीक पाहणी होऊ न शकलेल्या शेतकºयांची तपासणी करून अश्या शेतकºयांची प्रमाणित यादी बनवण्यात आली. सदर अधिकृत यादी आता सर्व संबंधित खरेदी केंद्रांवर पाठवण्यात आली आहे. ज्यांचा ई-पीक पाहणीनुसार खसºयावर पिकपेरा झाला नव्हता, त्यांनी नजिकच्या अधिकृत धान केंद्रावर जाऊन आपले नाव यादीनिहाय असल्यास आपले रजिस्ट्रेशन व धान विक्री 31 जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. ज्या शेतकºयांची ई-पीक पाहणी न झाल्याने धान खरेदी केंद्रावर नोंद झाली नाही, त्यांनी 31 जानेवारीपर्यंत धान खरेदी केंद्रावर जाऊन खरेदीसाठी नोंद करून घ्यावी. ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकºयांच्या याद्या तहसीलदारांनी प्रमाणित करून खरेदी केंद्रावर पाठवल्या आहे. त्या आधारे एनईएमएल पोर्टलवर नोंदणी 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी.
ई-पिक पाहणी न झालेले शेतकरी विकू शकतील धान
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
RELATED ARTICLES