गोंदिया : गोरेगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात 14 मार्च 2023 पासून ” NPS रद्द करून जुनी पेन्शन मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रविकांत बोपचे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संप मंडळाला भेट देत मार्गदर्शन केले.
यासह विविध प्रलंबित मागण्या, जुनी पेन्शन व इतर मागण्या संदर्भात रविकांत बोपचे यांनी उपस्थित संपक-यांसोबत संवाद साधत चर्चा केली. या वेळी रविकांत बोपचे यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य सशेद्र भगत, गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष केवलराम बघेलेे, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश येरोला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कृष्णकुमार बिसेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामू हरिणखेडे तालुका युवा अध्यक्ष सुरेंद्र रंहागडाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा रामटेके पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश कटरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष केवलराम बघेले व जगदीश येरोला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
गेल्या चार दिवसापासून विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन असल्यामुळे सर्वसामान्य जनता, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना वेठीस धरले जात आहे. सर्वसामान्यांची अनेको कामे रखडलेली असल्याने शासनाने या संदर्भात तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी रविकांत बोपचे यांनी केली. यापुढे रविकांत बोपचे म्हणाले की, पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा संवैधानिक हक्क आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मात्र शासन गेल्या अनेक वर्षापासून या प्रकरणाची दखल घेताना दिसत नाही. कर्मचारी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी संपात उतरला आहे. सर्वच विभागातील कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने मार्च एंडिंगची कामे करावी कशी, असा प्रश्नही आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे 20 मार्चपासून विदर्भ पटवारी संघटना ही संपात सामील होणार आहे. तलाठी संपात गेले तर शेतकऱ्यांची चांगलीच फजिती होणार आहे. यातच शेतकऱ्यांना मिळणारे दाखले ही वेळेवर मिळणार नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला येणार आहे, असे प्रतिपादन यावेळी केले.
“एकच मिशन जुनी पेन्शन” संप मंडपाला युवा नेते रविकांत बोपचे यांची भेट
RELATED ARTICLES