Friday, April 12, 2024
Google search engine
HomeUncategorizedएक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रम उत्साहात

एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रम उत्साहात

एक तास राष्ट्रवादीसाठी – महाराष्ट्राच्या आगामी विकासासाठी…!
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांनी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. त्या अनुसंगाने खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशानुसार महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादी हा उपक्रम राबविला जात आहे. आज गोंदिया तालुक्यातील ग्राम चुटिया येथे श्री प्रभू पटले यांच्या निवासस्थानी एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाला माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांची उपस्थिती होती.
माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले कि, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाला विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत. घरगुती गॅस चे वाढलेले भाव, पेट्रोल व डिझेलच्या किमती मुळे गगनाला भिडलेली महागाई कमी करण्यात यावी. शासनाने काही दिवसापूर्वी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केले. परंतु सदर बोनस अल्पसा असून ही एक प्रकारची शेतकऱ्यांची थट्टा आहे. कारण वाढलेले रासायनिक खताचे, किटकनाशकाचे, मजुरीचे व डिझेल चे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपये धानाला बोनस देण्यात यावा. सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यात उन्हाळी भात पिकाचे उत्पादन शेतकरी घेत असतो परंतु शेतकऱ्यांच्या पिकांना 8 तास विज देणे सुरु आहे. शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे हे धोकादायक आहे कारण जंगली जनावरांची व स्वापदाची व भिती असून अनेक दुखःद घटना घडलेल्या आहेत त्यामुळे दिवसा 12 तास विज मिळणे अति आवश्यक आहे. असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केतन तुरकर, प्रभू पटले, सुनील पटले, शैलेश वासनिक, दुर्योधन मेश्राम, डॉ पटले, राजेश रहांगडाले, हौसलाल रहांगडाले, रौनक ठाकूर, दिनेश शरणागत, जयप्रकाश मेश्राम, देवेंद्र गौतम, हिरामण येडे, भीमराव नागवंशी, देवदास वैष्णव, मोहन मडावी, कृष्णा बिसेन, लक्ष्मी तुरकर, विनोदभाऊ पटले, सुनील पटले, पप्पू पटले, ओमप्रकाश गौतम, विनोद कोटेवार, वीरेंद्र गौतम, दिलीप वैद्य, रोहित पटले, रोशन मडावी, भाऊलाल गौतम, गोवर्धन पटले, नितिन चित्रिव, प्रवीण चित्रिव, राजेश्वर रहांगडाले, दिलीप पटले, गेंदलाल येडे, शेखर पटले, विजय वाघाडे, बुधा भगत, व गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments