Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedएमबीएसच्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, शासकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील घटना

एमबीएसच्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, शासकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील घटना

गोंदिया : येथील शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने आपल्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
भूषण विलास वाढोणकर (२४) रा. रेल्वे चांदूर अमरावती असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नावे आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करीत आहे. भूषण विलास वाढोणकर हा विद्यार्थी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात इमारत क्रमांक ७ येथे तिसऱ्या माळ्यावर डी-३१ या रूममध्ये राहत होता. सकाळी आपली ड्युटी करून सायंकाळी रूमवर आला होता. रूममध्ये रहाणारा सहकारी हा रात्रीची ड्युटी असल्याने आपल्या ड्युटीवर गेला. परंतु सकाळी तो ड्युटीवर जाणार होता. परंतु सकाळी ८ वाजूनही ड्युटीवर न गेल्याने त्याच्या मित्राने दुसऱ्या मित्राला फाेन लाऊन त्याला ड्युटीवर येण्यास सांग असे सांगितले. त्याचा फोन बंद येत असल्याने त्याच्या मित्र मंडळींनी खोली गाठली. दाराला जोरजोराने वाजवूनही दार उघडले नसल्याने त्यांना संशय आला. दार आतून बंद होते. सहकाऱ्यांनी दाराला जोराने धक्का देत आतील कोंडा तुटला अन् दार उघडले. भूषणने सीलिंग पंख्याला दोराने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. ही घटना सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार देवनांद मलगाम व पोलीस शिपाई मच्छींद्र लांजेवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments