Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedकचारगड, मांडोदेवी आणि नागरा धाम देवस्थानाला ‘अ’ दर्जा द्या : आमदार विनोद...

कचारगड, मांडोदेवी आणि नागरा धाम देवस्थानाला ‘अ’ दर्जा द्या : आमदार विनोद अग्रवाल

गोंदिया : जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थान हे लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी या ठिकाणी कोया पौर्णिमेला ५ दिवसीय यात्रा भरते. या यात्रेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक दरवर्षी येत असतात. कचारगड हे माँ काली कंकाली पारी कोपार लींगो देवस्थान असून एक सुंदर असा पर्यटन स्थळ असून ऐतिहासिक वारसा पावला आहे. भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा म्हणून प्रसिद्धी पावलेली आहे. मात्र या पर्यटन स्थळाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. याच्या विकासासाठी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. असून या देवस्थानाला ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच नागरा येथील शिव धाम देखील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक वारसा प्राप्त असून दोन्ही शिवरात्रीला भाविकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती असते. शिवाय शहराच्या जवळ असल्याने येथे शनिवारी रविवार आणि सुटीच्या दिवशी नागरिक पर्यटनाच्या दृष्टीने भेट देतात. यासाठी आवश्यक तेवढी निधी प्राप्त झाली नसल्याने पाहिजे तेवढं विकास या स्थळाचा झालेला नसल्याने नागरा धामचे “अ” श्रेणीमध्ये श्रेणीवाढ करण्याची मागणी केली आहे. याशिवाय गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान देखील सुंदर पर्यटन स्थळ असून गोरेगाव आणि आमगाव तालुक्यातील नागरिकांचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी लाखो भाविक मांडोदेवी देवस्थान येथे दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी येथे सामूहिक विवाह सोहळा आयोजित केले जाते ज्यामध्ये सरासरी १०० पेक्षा जास्त जोड्यांचे लग्न संपन्न होते. ज्यामध्ये लाखोच्या संख्येने वराती उपस्थित होवून नवदाम्पत्याला आशीर्वाद देतात. घटस्थापनेच्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी याठिकाणी बघावयास मिळते. नवरात्रीमध्ये या ठिकाणी भाविकांची वर्दळ बघावयास मिळते. हे स्थळ जंगलाने व्यापलेला असून जवळच असलेल्या तलावात वन्यजीव पाण्याच्या शोधात येत असल्याने पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र याही पर्यटनाचा आणखी विकास व्हावा या हेतूने मांडोदेवी देवस्थानाला देखील ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करण्यात यावा अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी सचिव यांना आदेश केले असून लवकरच या स्थळांना ‘अ’ श्रेणी पर्यटन स्थळांच्या दर्जा प्राप्त होईल अशी अपेक्षा आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments