सालेकसा : तालुक्यातील कचारगढ येथे नुकतीच यात्रा पार पडली. अज्ञात समाजकंटकाने कचारगढ येथे स्थापित गणेश मूर्तीची तोडफोड केल्याचा प्रकार 7 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आला. ही बाब धार्मिक भावना दुखावणारी असून हे दृष्टकृत्य करणाºया तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सालेकसा यांनी केली आहे.
याप्रकरणी सालेकसा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गणेश मूर्ती तोडणाºया व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्त्या अज्ञात व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी आणि मूर्तीची पुनरस्थापना करण्यात यावी अशी मागणी बजरंग दल संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सालेकसा यांनी केली आहे. त्या समाजकंटका विरुद्ध योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून देण्यात आला आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219