2.82 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे निर्देश, आदेशान्वये संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रभावी धाड कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने 17 एप्रिल रोजी पोलीस ठाणे चिचगड येथील पोलीस पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे मौजा कोटजांभोरा ते नवेगाव बांधकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रदरम्यान नाकाबंदी करून 21.15 वाजता दरम्यान छापा कारवाई केली असता एक अशोक लेलँड कंपनीचा पिकअप वाहन मिळून आले असता वाहन चालक जंगलाचा व अंधाराचा फायदा घेवून पळून गेल्याने पिकअप वाहनां चे डाल्याची पाहणी केली असता पिकअप चे डाल्या मध्ये 8 नग जनावरे कोणत्याही प्रकारची हालचाल न करता निर्दय तेने कोंबलेल्या स्थितीत दिसुन आल्याने चारचाकी पिकअप वाहन किंमती अंदाजे 2 लाख/-रु व 8 नग जनावरे किंमती 82 हजार रू असा एकूण किंमती 2, लाख 82 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
पिकअप वाहनाच्या डाल्यामधील 8 नग जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता गौशालेत ठेवण्यात आले आहे.
सदर प्रकरणी अज्ञात आरोपी वाहन चालक यांचेविरुध्द पोलीस ठाणे चिचगड येथे प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे. सदरची कारवाई मा.वरिष्ठांचे निर्देश,आदेशा प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. विजय भिसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे चिचगडचे ठाणेदार श्री. शरद पाटील यांच्या नेतृत्वा खाली पोलीस अंमलदार पो.हवा.मसराम, पो.ना. कानसकर,पोशि. तांदळे, खोब्रागडे यांनी नाकाबंदी करून कारवाई केलेली आहे.
कत्तलखान्यात जाणाऱ्या 8 जनावरांची सुटका
RELATED ARTICLES