गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा/बोळदे शेतशिवारातील आत्माराम टेंभुर्णे यांचे शेतातील विहिरीत बिबट पडल्याची घटना १५ डिसेंबरला शातमालकाचे दुपारी १२ वाजेच्या दरम्यान निदर्शनास आली.याची माहीती लगेच वनविभागाला देण्यात आली.नवेगावबांध प्रादेशीकचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.जी.अवगान यांनी यंत्रणा हालवुन सदर बिबट्याला दुपारी २ वाजेच्या दरम्यान सुरक्षित विहिरीबाहेर काढुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
अशातच आज १५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान एक अंदाजे सात आठ महिणे वय असलेला बिबट कवठा शेतशिवारातील आत्माराम टेंभुर्णे यांचे शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले.सदर विहिरीत अल्पसा पाणी असल्याने विहिरीतील खडकावर बिबट बसलेला होता.वनविभागाच्या जलद बचाव पथकाचे अथक प्रयत्नाने दुपारी २ वाजेच्या दरम्यान विहिरीत पिंजरा टाकुन सदर बिबट्याला सुरक्षित बाहेर काढुन नैसर्गिक अधीवासात सोडण्यात आले.
कवठा शेतशिवारातील विहीरीत बिबट पडला
RELATED ARTICLES