Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedकार्यकर्त्यांनी सर्व जबाबदारी घेऊन पक्षाची कामे करावीत : माजी आमदार राजेंद्र जैन

कार्यकर्त्यांनी सर्व जबाबदारी घेऊन पक्षाची कामे करावीत : माजी आमदार राजेंद्र जैन

गोंदिया : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन जनतेची कामे करावीत व पक्षाच्या संघटनेत वाढ़ करावी. संघटन हीच पक्षाची शक्ती असते. कृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचे खरेदी व विक्री करणारी शेतकऱ्यांची विश्वसनीय संस्था आहे. शेतकऱ्यांना उत्पादित मालाची खरेदी व विक्री करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी खा.श्री प्रफुल पटेलजी नेहमी अग्रेसर राहिले आहेत. आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्या समर्थित विचारांचे लोक निवडून आले तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास अडचण येणार नाही. असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
आज नवप्रेरणा विणकर सभागृह, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, श्री धनंजय दलाल, श्री देवचंद ठाकरे, श्री रितेश वासनिक, श्रीमती सरिता मदनकर, श्रीमती रीता हलमारे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक व विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी आमदार श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, खा.श्री प्रफुल पटेलजी यांनी सदैव शेतकरी व शेतमजूर वर्गाच्या हिताचा विचार केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बोनस, अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना शासकीय मदत या बाबतीत नेहमी सकारात्मक राहून कार्य केले आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनल चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी कोणतेही हेवेदावे न करता प्रयत्न करावे.
पक्षाचे कार्य करतांना कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे व आपसातील भेदभाव विसरून आपुलकीने पक्षाच्या ध्येय धोरणावर काम करावे व आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार आणावे असे प्रतिपादन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी केले. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, देवचंद ठाकरे, रितेश वासनिक, सदाशिव ढेंगे, एकनाथ फेंडर, महादेव पचघरे, नरेशभाऊ ईश्वरकर, आनंदभाऊ मालेवार, सुभाष गायधने, सचिन गायधने, योगेशभाऊ सिंगनजुडे, अनिल काळे, सरिता मदनकर, रिता हलमारे, प्रीती शेंडे, रेखाताई हेडाऊ, वंदनाताई पराते, सुमन मेहर, उमेश भोंगाडे, प्रदीप बुराडे, परमेश नळगोपुलवार, विजय बारई, दुर्योधन आत्राहे, सुनिलकुमार कहाळकर, ज्ञानेद्र आगासे, विनोद बाभरे, चेतन डोगरे, दिलीप गजभिये, अर्जुन साखरवाडे, सुरेंद्र गणवीर, अरुण हूल, देवराम बोन्द्रे, विलास बोन्द्रे, भगवान आगासे, दुर्गेश उके, विनोद बन्सोड, दुर्योधन बोन्द्रे, मोनू बर्वे, देवदास बोन्द्रे, शिवलाल लाळे, लीलाधर धार्मिक, मनोहर हेडाऊ, के डी पराते, पांडुरंग किरपाने, नितीन भोयर, छोटूलाल मीरासे, संतुलाल गजभिये, गुलाब साव्वालाखे, सुशांत लिल्हारे, रोशन लिल्हारे, भरातलल पटले, अतुल खांडेकर, रौनक ठाकुर, राधेश्याम पडोळे, नंदकिशोर गायधणे, श्रीपाद डोये, मनोज डोये, गोवर्धन डोये, अरविंद कारेमोरे, जागेश्वर मेश्राम, सचिन कारेमोरे, देवाजी पचघरे, देवनाथ अतकरी, कैलास अतकरी, सुनील शीतलाम, भगवान सिंगनजुडे, डेबू शेख, पवन रामटेके, सचिन गोस्वामी, हेमंत मोहतुरे, अरविंद येळणे, अतुल भोवते, सुनील शेंडे, चेतन ठाकूर, संजय मीरासे, मनोज वासनिक, शिवशंकर गाढवे, नारायण कुंभारे, पुंडलिक गिरेपुंजे, राहुल वानखेडे, उमेश गाढवे, दिगंबर बालपांडे, संजय पुंडे, राजेश मेश्राम, विलास कुंभारे, सहादेव वैद्य, गणेश हर्कंडे, गणेश मेहर, मंगेश निखारे, दशरथ मेसराम, जगदीश तुपट, मुरलीधर मेश्राम, गजानन इलमे, राजकुमार झंझाड, ग्याणिराम इलमे, उमेश टेकाम, विजय बारई, प्रमेश नळगोपुलवार, डॉ शुक्ला, मदन गडरीये, गौरीशंकर नागफासे, शुभम पडोळे, प्रभाकर बारई, सुभाष भाजीपाले, विजय गायधणे, रामकृष्ण इटणकर, मंगेश बाहे, महादेव बुरडे, देवाजी पचघरे, देवनाथ अतकरी, भगवान घोनमोडे, रोहित बुरडे, अनिता पटले, शारदा गाढवे, अनिता गजभिये, सुमन मेहर, रेखा हेडाऊ, सचिन बांडेबूचे, राजधर शेंडे, मुन्ना गोबाडे, प्रमिला साखुरे, ब्रिजलाल गभणें, याकूब बर्वे, ध्याणेश्वर खंडाळे, ईश्वर माटे सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments