13 डिसेंबर ला आयोजन, समग्र शिक्षा, समाज कल्याण विभाग व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सेंटर गोंदिया चा संयुक्त उपक्रम..
गोंदिया – समाजात वावरताना दिव्यांग व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. हा सामना करतांना मुलींना विषेतः किशोरवयीन मुलींना व्यक्त होत येत नसल्याने किंवा त्यांच्या कडे समाजाचा दृष्टिकोन अजूनही नकारात्मक असल्याने याची जाणीव अश्या मुलींना व त्यांच्या पालकांना व्हावी या करीता एक दिवसीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 13 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग गोंदिया येथे सकाळी 11.00 वा. पासून करण्यात आले असल्याची माहिती समग्र शिक्षा विभागाचे दिव्यांग विभाग जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी दिली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन श्री अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली श्री विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, विशेष समाज कल्याण हे करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल पुंड, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ महेंद्र गजभिये तथा समाज कल्याण अधिकारी श्री संजय गणवीर राहणार आहेत. कार्यशाळेत महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती डी. बि.खोब्रागडे, श्रीमती स्नेहा लांडे, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस अधीक्षक कार्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ राणा खान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यामध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना उपस्थित करण्याचे आवाहन समग्र शिक्षा चे दिव्यांग विभाग जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, समाज कल्याण च्या सहाय्यक सल्लागार श्रीमती वैशाली तायडे व प्रा. डॉ. शशिकांत चवरे यांनी केले आहे.