मुख्याधिकारी, प्रशासक तथा तहसीलदार यांचे संगनमत
तक्रार दाखल करून कार्यवाही शून्य
बाजार समितीचे तारीख पे तारीख
बाजार समितीवर प्रशासक व मुख्याधिकारी, प्रशासक तथा तहसीलदार यांच्या निलंबनाची मागणी
गोंदिया : आमगाव नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतने चक्क नगर परिषद च्या मालकी हक्क जमीन वर अनधिकृतणे व्यापारी संकुले तयार करुन ते परस्पर वितरीत करून आर्थिक लाभ घेतला आहे. परंतु तक्रार दाखल करून कार्यवाही शून्य आहे. आता नागरीकानी बाजार समितीवर प्रशासक व मुख्याधिकारी, प्रशासक तथा तहसीलदार यांच्या निलंबनाची मागणी.
जिल्ह्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या अनियमित कार्यप्रणालीने गाजली आहे. पूर्वीच मवेशी बाजार लीलाव नगर परिषद जागेत अनधिकृतपणे भरावून महसूल गोळा करून नगर परिषद चे महसूल बुडविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यातच कृषी उत्पन्न बाजार समिती ने थेट नगर परिषद आमगाव यांच्या मालकी हक्क जमीनीवर अनधिकृतणे व्यापारी संकुले बांधकाम करुन ते परस्पर वितरीत केले आहे.यात प्रशासक तथा तहसीलदार रमेश कुंभारे व मुख्याधिकारी यांचे संगनमत दिसून आले आहे. नागरिकानी याबाबद स्थानीक प्रशासाविरोधात जिल्हाधिकारी व महसूल नगर विकास विभाग यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती. यात कृषी उत्पन्न बाजार समिती चौकशी करीता तारीख पे तारीख मागताना पत्रव्यवहार करीत आहे.
नगर परिषद आमगाव यांची मौजा आमगाव येथे गट क्रमांक ४४आराजी ०.६४.००हेक्टर आर जमीन आहे.या जमिनीचे संपूर्ण महसूल अधिकार नगर परिषद आमगाव कडे आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव संचालक मंडळ यांनी आपल्या अधिकाराचे दुरुपयोग करून नगर परिषदच्या याच जमीनीवर व्यापारी गाळे तयार करुन ते परस्पर वितरीत केले. व्यापारी संकुले तयार करून घेताना प्रशासक तथा तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी मौन का साधले हे चर्चेचा विषय बनला आहे.या व्यापारी संकुले बांधकाम व वितरणात मोठी रक्कम देवाणघेवाण झाली यात शंका नाही.
नागरिकांनी या अवैध व्यापारी संकुले बांधकामची
चौकशी करण्याबाबत प्रशासनाकडे दिनांक ८ आगस्ट २०२३ ला ग्राम सरक्षण समितीने लेखी तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. परंतू कृषी उत्पन्न बाजार समितीने या चौकशी समोर होण्याआधी सबळ पुरावा दाखल करण्यासाठीं २४ आगस्त २०२३ पत्र देऊन मुदत मागण्यात आले.पण चार महिने लोटूनही तारीख पे तारीख मागताना पत्रव्यवहार करीत आहे.
तर मुख्याधिकारी व प्रशासक तथा तहसीलदार यांनी तक्रार अर्ज यावर कोणतीच कारवाई केली नाही. यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याची मागणी केली यावर प्रशस्थ कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अवैध व्यापारी संकुले बांधकाम व वितरण याविरुद्ध नागरीकानी राज्यशासनाकडे कृषी उत्पन्न बाजार समिती वर प्रशासक तथा तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या निलंबनाची मागणी प्रमोद शिवणकर, तीरथ येटरे, रामकिशन शिवणकर,बाळू वंजारी, उमेश चतुर्वेदी,सागर फुंडे,राम चक्रवर्ती, यशवंत मानकर, राजेश देशमुख,दिलीप फुंडे. पिंटू महारवाडे, विनोद डोये, मुकेश शिवणकर,मेघश्याम फुंडे, किशोर फुंडे, सतीश शिवणकर, सतीश थेर, विजय शेंडे, सतीश दोनोडे, लक्ष्मण शेंडे,तेजस कावळे, डॉ. ओमप्रकाश थेर, गोकुल बसेन,दिलीप मेश्राम, मोणू गिरी , संदीप भांडारकर,शिरीष भांडारकर,जितेश वाढई , मेघश्याम मेंढे व नागरिक यांनी केली आहे.
कृउबासचे नपच्या जमिनीवर अनधिकृपणे व्यापारी संकुले
RELATED ARTICLES