अध्यक्ष व मुकाअ यांना निवेदन
जाहीर माफी न मागितल्यास यापुढे होणाऱ्या सभेवर बहिष्कार
गोंदिया. जिल्हा परिषदेच्या 26.07.23 दिनांक रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत शिक्षण विभागातील विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक जिल्हा परिषदेचे कृषी व पशसंवर्धन सभापती सोनू कुथे यांनी प्राथमिक विभागांचे शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांना असभ्य भाषेत बोलून अपमानजनक वागणूक दिली. त्यामूळे या बाबीचा निषेध करत आज गोंदिया जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले. तथा यात सभापती यांनी जाहीर माफी मागावी तसेच यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची ग्वाही द्यावी अन्यथा यापुढे होणाऱ्या कुठल्याही सभेत जिल्हा परिषदेचे कोणतेही विभागप्रमुख उपस्थित राहणार नाहीत असा सज्जड इशारा सर्व विभाग प्रमुखांनी दिला. तसेच सदर निवेदनाची एक् प्रत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाला सुद्धा पाठविण्यात आली असल्याची माहिती विभागप्रमुख यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर , गोविंद खामकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत , कादर शेख शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ,संजय गणवीर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ,डॉ नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी प्राथमिक इत्यादी उपस्थित होते.
कृषी सभापतींच्या असभ्य वागणुकीचा विभाग प्रमुखांद्वारा सामुहिक निषेध
RELATED ARTICLES