गोंदिया : केंद्रीय भूमीजल बोर्ड, मध्य क्षेत्र, नागपूर येथील वैज्ञानिक ‘घ’ अभय निवसरकर यांनी आज जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची भेट घेऊन त्यांना गोंदिया जिल्ह्याचा ‘भूजल नकाशे आणि भूजल व्यवस्थापन व नियोजन’ याबाबत अहवाल सादर केला.
गोंदिया जिल्ह्यात पाण्याच्या उपलब्धतेबाबत काय परिस्थिती आहे. तसेच जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता व कोणत्या क्षेत्रात पाणी मुरवण्याची आवश्यकता आहे याबाबत यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील ‘भूजल नकाशे आणि भूजल व्यवस्थापन व नियोजन’ याबाबत केंद्रीय भूमीजल बोर्ड नागपूर येथील अधिकारी अभय निवसरकर यांनी सादर केलेला अहवाल हा जिल्ह्यासाठी खुपच महत्वाचा असून भविष्यात त्याची गरज भासणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत तसे नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी भूजल संबंधित विभागाच्या यंत्रणांना दिले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक आशिष ब्राम्हणकर व मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत जगताप उपस्थित होते.
केंद्रीय भूमीजल बोर्डतर्फे जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा सादर
RELATED ARTICLES