Friday, October 11, 2024
Google search engine
HomeUncategorizedक्रीडा स्पर्धेसाठी 624 खेळाडूंचा सहभाग

क्रीडा स्पर्धेसाठी 624 खेळाडूंचा सहभाग

गोंदिया : गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलावर पहिल्यांदाच राज्यस्तरीय बास्केटबॉल 14 वर्ष मुले/मुली व रोलबॉल 17 व 19 वर्ष मुले/मुली वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींच्या स्पर्धा 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. राज्यातील आठ विभागातून 48 संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. सरकार मान्य 18 क्रीडा प्रकारातील विभागीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्यास यावर्षी मिळाला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा अधिकारी-जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल/रोलबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार असून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाºया या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातील आठ क्रीडा विभागातून बास्केटबॉल 14 वर्ष मुले/मुली करीता 176 व रोलबॉल 17 व 19 वर्ष मुले-मुली करीता 448 असे मिळून एकूण 624 खेळाडू, त्यांचे संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments