गोंदिया. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे 1 सप्टेंबर पासून आयुष्यमान भव ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत दर शनिवारी एका संकल्पना वर आधारित आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात मार्गदर्शिका म्हणून के टी एस जिल्हा रुग्णालया च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर
जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ मीना वट्टी जिल्हा आय डी एस पी समनव्यक डॉ सुशांकी कापसे जिल्हा आय पी एच एस समनव्यक डॉ सुवर्णा उपाध्याय डॉ अर्चना जाधव व एन आर सी च्या आहार तज्ञा स्वाती बन्सोड बी जी डब्लूच्या पी एच एन वासनिक रुपाली टोने प्रियांका डोंगरे आदी प्रामुख्याने उपस्तिथ होत्या.
डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की क्षय रोगाची शंका वाटली की मोफत थुंकी तपासणी करून घ्यावी .क्षय रोग चा उपचार सर्व सरकारी रुग्णालयात मोफत मिळतो
सरकार तर्फे निदान झालेल्या टी बी रुग्णाला पौष्टीक आहार खाण्यासाठी दर महा 500 रुपये निक्षय योजनेतर्फे थेट बँक अकाउंट मध्ये दिले जातात संपूर्ण औषध उपचाराने टीबी बरा होऊ शकतो, खाजगी वैद्यकीय व्यवसाईकांनी देखील आपल्या कडील नोंदणी झालेल्या व उपचारावरील सर्व टीबी रुग्णांची माहिती सरकार ला दिलीच पाहिजे . आपण सर्वांच्या सहकार्याने क्षयमुक्त गोंदियाचा संकल्प घेऊ या असे आवाहन या वेळी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले.
या वेळी आहार तज्ञा स्वाती बन्सोड यांनी टी बी रुग्णानी संतुलित आहार कसा घ्यावा. या बाबत उपयुक्त माहिती सांगितली आयुर्वेद तज्ञा डॉ मीना वट्टी यांनी टी बी मुक्ती साठी आयुर्वेदीक टिप्स दिल्या. डॉ अर्चना जाधव यांनी निक्षय मित्र बद्दल सविस्तर माहिती दिली
या वेळी टी बी मुक्त भारत बाबत आरोग्य माहिती पत्रके उपस्थित रुग्णांना वाटण्यात आले .