Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedखासदार सुनील मेंढे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

खासदार सुनील मेंढे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

भंडारा : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची खासदार सुनील मेंढे यांनी भेट घेऊन भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात चर्चा केली. याचवेळी त्यांनी मतदारसंघात पर्यटन विकासावर भर द्यावा असा आग्रह पंतप्रधानांकडे केला.
जगात भारताला अढळ स्थान निर्माण करून देणाऱ्या पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांची भेट ही आपल्यासाठी अविस्मरणीय होती, असे त्यांनी सांगितले. या भेटीत शेतकरी, धान या विषयावर चर्चा करण्यात आली. चिन्नोर तांदळाला जी.आय. टॅगिंग प्राप्त झाल्या संदर्भात पंतप्रधानांना माहिती दिली व त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल असे सांगितले. रेशीम उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने मतदारसंघात प्रयत्न सुरू असून त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती यावेळी पंतप्रधानांकडे खासदार सुनील मेंढे यांनी केली. भेटी दरम्यान विकास कामांची माहिती देणारी पुस्तिका व भंडाऱ्याची ओळख असलेल्या कोशाच्या कापडाचे धोतर आणि दुपट्टा भेट देण्यात आला. यावेळी खासदारांचे कुटुंब सोबत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments