पोलीस स्टेशन गंगाझरी पोलिसांची कामगिरी
गोंदिया : फिर्यादी नामे सोयब मुन्नालाल पुराम, वय 31 वर्ष, रा. शहरवानी , ता. गोरेगाव, जि. गोंदिया व जखमी विशाल गणेश ताराम, वय 25 वर्षे, रा. लेंडझरी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया हे दोघेजण शहारवाणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेजारील एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असता, जखमी विशाल ताराम याचे दोन ते तीन मित्र त्या ठिकाणी आले. म्हणून विशाल ताराम त्यांच्यासोबत चेष्टा मस्करी करून ते एकमेकाला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी बाजूच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात उभा असलेला आरोपी सुरज चुनीलाल मेश्राम, वय 28 वर्ष, रा. शहरवाणी यास ते लोक त्याला शिवीगाळ करीत आहे असे वाटल्याने सुरज मेश्राम व विशाल ताराम यांच्यात वाद होऊन त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सुरज मेश्राम तेथून निघून गेला व काही वेळातच त्याचे वडील चुनीलाल तुकाराम मेश्राम, वय 50 वर्ष व भाऊ अमर चुनीलाल मेश्राम वय 20 वर्ष यांच्यासह परत आला. त्यावेळी चुनीलाल मेश्राम यांनी फिर्यादी यांना काठीने मारण्याचा प्रयत्न केला, तसेच अमर मेश्राम यांनी फिर्यादी यांना चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी घाबरून त्या ठिकाणाहून पळून गेले असता, उपरोक्त तिन्ही आरोपींनी मिळून विशाल ताराम याला मारहाण केली अमर मेश्राम याने त्याच्याकडील चाकूने विशाल मेश्राम याच्या मानेवर वार करून, त्यास गंभीर दुखापत करून, त्याला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दिनांक 07/07/2023 रोजी पोस्टे गंगाझरी अप. क्रमांक 227/2023 भारतीय दंड विधान कलम 307, 323, 352, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पो.नि. महेश बनसोडे हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रदीप मडामे यांनी नमुद गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने ठाणेदार, पोस्टे गंगाझरी यांना आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना प्रमाणे पोस्टे गंगाझरीचे पो.नि. महेश बनसोडे यांनी स्टाफच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन रात्री उशिरा पर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावे सुरज चुनीलाल मेश्राम, वय 28 वर्ष, अमर चुनीलाल मेश्राम, वय 20 वर्ष, चुनीलाल तुकाराम मेश्राम वय 50 वर्ष, तिघे रा. शहारवाणी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात पो.हवा. मनोहर अंबुले, भूपेश कटरे, भरत पारधी, पो.ना. महेंद्र कटरे, पो.शि. राजेश राऊत यांनी केलेली आहे.
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या काही तासात अटक
RELATED ARTICLES