Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedखेळाडू वृत्ती व सांघिक भावना जोपासा : जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

खेळाडू वृत्ती व सांघिक भावना जोपासा : जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन थाटात : 801 खेळाडूंचा सहभाग

गोंदिया : कर्मचारी नेहमीच आपल्या कार्यात मग्न असतात. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळालं पाहीजे. खेळातून व्यक्ती विकासाला चालना मिळते. त्यामुळेच क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत सहभागी होवून सांघिक भावना व खेळाडू वृत्ती जोपासा. वैयक्तीक विकासासोबतच ग्रामीण भागातील शेवटच्या स्तरापर्यंत सेवा पोचविण्यासाठी सुध्दा प्रयत्नरत रहा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष मा. श्री. पंकज रहांगडाले यांनी केले.
जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव -2023 चे आयोजन करण्यात आले. त्याच्या उद्घाटन सोहळयात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिल पाटील, अर्थ व बांधकाम समिती सभापती श्री. योपेंद्रसिंह टेंभरे, कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती मा. श्री. रूपेश कुथे, जिल्हा परिषद सदस्या उषाताई मेंढे, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरेश भांडारकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोविंद खामकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. संजय गणवीर, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. डॉ. एम. आर. गजभिये, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. एस. एन. राऊत, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुमित बेलपत्रे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी श्री. डॉ. कांतीकुमार पटले, मग्रारोहयोचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. डी.बी. हरिणखेडे, जिल्हा कृषी अधिकारी श्री. एम. के. मडामे यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद हे आपले कुटूंब आहे. कुटूंबात वाद असतात. मात्र, वादाचे विसंवादात रूपांतर होवू नये. आपल्या कुटूंबाचा हा सोहळा आहे. त्यामुळे त्याचा उत्साह टीकवून ठेवा. तुमच्या सुप्त गुणांना जनतेसमोर आणण्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल पाटील यांनी केले. कृषी व पशूसंवधन समिती सभापती रूपेश कुथे यांनी आयोजनांसाठी अभिनंदन केले. अशाप्रकारचे आयोजन दरवर्षी व्हावे, असा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती शितल पुंड यांनी करून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. सकाळी 8 वाजता मशाल पेटवून सांघिक व वैयक्तीक खेळाचे तर सायंकाळी 6 वाजता दीप्र प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाला सुरवात झाल्यानंतर खेळांच्या उद्घाटन सत्रात जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. पंकज रहांगडाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिल पाटील यांच्यात तर कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. रूपेश कुथे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड यांच्यात क्रिकेटचा उद्धाटन सामना खेळण्यात आला. क्रिकेटसह बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, व्हॉलीबॉल, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, दौड, स्लो सायकलिंग, संगित खुर्ची, रस्सीखेच, कबड्डी, खो-खो आदी विविध सामन्यात सुमारे 801 खेळाडूंनी भाग घेतला. तर सांस्कृतिक कार्यक्रमांत विविध नृत्य, नाटीका, गीत गायनाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या महिलांनी भारतीय परिधानावर सादर केलेला ‘फॅशन शो’ चांगलीच दाद मिळवून गेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली खोब्रागडे आणि माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री. अतुल गजभिये यांनी तर क्रिडा कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक तथा जि.प. पतसंस्थेचे सचिव श्री. कमलेश बिसेन यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments