Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedगंगाधर परशुरामकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

गंगाधर परशुरामकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

गोंदिया : राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या आदेशाने गंगाधर परशुरामकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. सोबतच परशुरामकर यांना गडचिरोली निरक्षक म्हणुन पदभार देण्यात आला. तसेच गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदी प्रेमकुमार रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली येथे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. जैन यांनी नवनियुक्त सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष यांना पुढील वाटचालीच्या शूभेच्छा दिल्या. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगगडाले, राजलक्ष्मी तुरकर, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, किशोर तरोने, केतन तुरकर, यशवंत परशुरामकर, करण टेकाम दिलीप डोंगरे, राजेश तायवाडे, सुनील पटले शैलेश वासनिक, प्रतीक पारधी, शरभ मिश्रा, वामन गेडाम सहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments