Wednesday, October 30, 2024
Google search engine
HomeUncategorizedगांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, 2 लाख 69 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, 2 लाख 69 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी एन.डी.पी. एस. कायद्याअंतर्गत प्रभावी दर्जेदार धाडी घालून कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. वरिष्ठांचे प्राप्त निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पो. नि.श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. चे पथक जिल्ह्यात अंमली पदार्थ बाळगून तस्करी, विक्री काळाबाजार करणाऱ्या गुन्हेगारांचा, तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांचे माहिती घेत असताना स्था. गु. शां. पथकास दिनांक- 29/07/2024 रोजी गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, दोन इसम हे ओडिसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेवून गोंदिया मरारटोली, भागात येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने पो.नि. श्री. लबडे आणि मा. वरिष्ठांना सदर माहिती कळवून मा. वरिष्ठांचे प्राप्त आदेश, दिशा निर्देश व परवानगी वरून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीस ठाणे रामनगर हद्दीत धाड कारवाईस लागणारे आवश्यक सर्व साहित्य, शासकीय पंच, मापारी, फोटोग्राफर, पो. स्टाफ, सोबत घेऊन रवाना होवून मरारटोली बसस्थानक समोरील गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रोडवर सापळा रचून कारवाई करण्यात आली असता अवैधरित्या गांजा ची खेप घेवून येणाऱ्या दोघांना मो. सा. सह दुपारी 15.30 वाजता दरम्यान रंगेहाथ पकडण्यात आले. त्या दोघांना ही पोलीसांची ओळख देवून त्यांना ताब्यात घेण्याचे कायदेशीर कारण सांगून प्राप्त माहिती प्रमाणे त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या दोन्हीं बॅगची पंचासमक्ष पाहणी केली असता त्याचे ताब्यातील निळ्या रंगाच्या ट्रॉली व स्कुल बॅगमध्ये सेलोटेप ने गुडाळलेले (वेस्टन असलेले) 12 नग बंडल मिळुन आले. वेस्टन असलेल्या बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रीत एकूण वजनी 12 किलो 160 ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा किंमती एकूण 2,69,500/- (दोन लक्ष एकोंसत्तर हजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल) मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे. मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात सदरची धाड कारवाईची सविस्तर जप्ती प्रक्रिया कारवाई करण्यात आलेली आहे.

अवैधरित्या विक्री करीता गांजाची खेप आणणारे आरोपी दिनेश विजयकांत मिश्रा, वय 38 वर्षे, रा. काका चौक , सिव्हिल लाइन्स गोंदिया, सोमेश्वर जोशीराम न्यायकरे वय 36 वर्षे राह. गिरोला, पांढराबोडी तां. जि. गोंदिया यांचेविरूध्द अंमलदार पो.हवा. राजेंद्र मिश्रा, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे रामनगर येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. दोन्ही आरोपीतांना जप्त मुद्देमालासह रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत. सदरची दर्जेदार धाड कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, पो.नि. प्रविण बोरकुटे पो.ठाणे रामनगर यांचे मार्गदर्शनात मपोउपनि-वनिता सायकर पोलीस अंमलदार पो.हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, भूवनलाल देशमुख, सुजित हलमारे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार, मपोशि कुमुद येरणे, यांनी कारवाई केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments