Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedगावठी कट्टयासह तिघांना अटक, 98 हजारांचा मुद्देमाल  जप्त

गावठी कट्टयासह तिघांना अटक, 98 हजारांचा मुद्देमाल  जप्त

गोंदिया : रावणवाडी पोलिसांनी आर.टी.ओ. चेक पोस्ट, रावणवाडी येथे अवैधरित्या पिस्तुल सारखा कट्टा सोबत बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठांच्या प्राप्त आदेश निर्देशाप्रमाणे जिल्ह्यांतील अवैध कृत्य करणाऱ्यां.. तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांची माहिती काढून शोध घेवून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक 21/03/2024 रोजी रात्र दरम्यान पोलीस ठाणे रावणवाडी चे पो. निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सोबत पोलीस स्टाफ स.पो.नि. सुनिल अंबुरे व पो.हवा. संजय चौहान असे पोलीस स्टेशन रावणवाडी हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदाराकडुन खाञीशिर माहीती मिळाली की, तीन इसम मोटार सायकल क्रमांक एम.पी.50/ एम.टी. 7198 वर ट्रिपल सीट बसुन बालाघाट कडुन गोंदिया कडे जाणार असुन त्यांचे कडे पिस्तुल सारखा दिसणारा गावठी कट्टा आहे व ते इसम गावठी कट्टा विक्री करण्याकरिता गोंदिया ला जाणार आहेत. अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरुन नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी रावणवाडी शिवारातील गोंदिया बालाघाट रोडवर असलेल्या आर. टी. ओ बॅरेल चेक पोस्ट जवळ सापळा रचुन नाकाबंदी केली असता मोटार सायकल क्रमांक एम.पी. 50 / एम.टी. 7198 ने येत असताना दिसून आल्याने तिन्ही संशयितांना थांबवुन विचारणा केली असता *संशयित ईसंम नामे -* *1) विशाल मुलायचंदसिंह लिल्हारे वय 23 वर्ष रा. बगदरा ता. जि. बालाघाट (म.प्र.)* व *त्याचे सोबत असलेले दोन विधीसंघर्षीत बालकांना* ताब्यात घेण्यात आले.. त्यांचेकडे असलेल्या सामानाची पाहणी करून झडती घेतली असता त्यांचेकडे खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला, 1) एक पिस्तुल सारखा दिसणारा गावठी कट्टा कि.* सु. 50,000/- रु. *2) एक काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन मोटार सायकल* क्रमांक एम.पी. 50/ एम.टी. 7198 कि. सु. 30,000/-रु. 3) *एक निळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल* कि. सु. 3,000/ रु. 4) *एक सिल्वर रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल* फोन कि. सु.10,000/ रु. 5) एक निळया रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन कि. सु. 5,000/- रु. *असा एकुण 98,000/ रु. चा मुद्देमाल* मिळुन आल्याने हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. उपरोक्त नमुद आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालका विरुध्द पोलीस स्टेशन रावणवाडी येथे फिर्यादी पो. हवा. संजय रमेश चौहान यांचे रिपोर्ट वरुन *अपराध क्रमांक 104/ 2024 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर पोलीस स्टेशन रावणवाडी यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुरे पुढील तपास करित आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया श्री.निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे पो. नि. पुरूषोत्तम अहेरकर, स. पो. नि. सुनिल अंबरे, पो.हवा. संजय रमेश चौहान यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments