Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedगाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार

मोदी की गारंटी’ आता गावागावात

पत्रकार परिषदेत खा. सुनिल मेंढे यांची माहिती

गोंदिया : भारतीय जनता पार्टी तर्फे दि. 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती. खा.सुनिल मेंढे यांनी दिली. ते आज 3 फेब्रुवारी रोजी येथिल शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात य़ेणार आहेत.
शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. या अंतर्गत राज्यात 50 हजार युनिट्समध्ये भाजपाचे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल, अशी माहिती खासदार सुनिल मेंढे यांनी दिली.
प्रत्येक युनिटमध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल, असेही. खा.सुनिल मेंढे यांनी सांगितले .
या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड येसूलाल उपराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार रमेशभाऊ कुथे, भंडारा- गोंदिया समन्वयक वीरेंद्र अंजनकर, जिल्हा उपाध्यक्ष भावनाताई कदम, जयंत शुक्ला, गजेंद्र फुंडे, अमित झा, भरत क्षत्रिय, शंभूशरणसिंह ठाकूर, अंकित जैन, मनोज पटनायक, गौरेश बावनकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments