गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसाची सुरुवात होताच शहरातील व गावातील वस्त्यांमध्ये आग लागण्याच्या घटना दिसून येतात. अशीच एक घटना सालेकसा आमगाव खुर्द निवासी मधू बागडे यांच्या गुरांच्या गोठ्याला 3 रोजी दुपारी 4 वाजे आग लागण्याची घटना समोर आली. आग एवढी भयानक होती की या आगीमध्ये संपूर्ण गोठा जळून खाक झाला.आग लागताच मोठ्या प्रमाणात धुवा उडू लागला हे पाहताच लोकांची गर्दी जमा झाली. गर्दी जमलेल्या लोकांनी आग विजवनाचा प्रयत्न सुरू केला. काही लोकांनी लागण्याच्या घटनेची माहिती नगरपंचायतला दिली असता अग्निशामक यंत्रांनी आग वीजवली पण तो पर्यंत बराच सां भाग जळून खाक झाला होता.या मध्ये जिवीत हानी झाली नाही पण संपूर्ण गोठा जडल्यामुळे मधु बागडे यांच्या लाखो रुपयांच्या नुकसान झाला.