Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुरूच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहचता येते : मुख्यमंत्री फडणवीस, हनुमंत कथा कार्यक्रमात हजेरी

गुरूच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहचता येते : मुख्यमंत्री फडणवीस, हनुमंत कथा कार्यक्रमात हजेरी

गोंदिया : कलयुगात ईश्वारापर्यंत पोहचण्यासाठी गुरू हे महत्वाचे माध्यम आहे आणि हे सौभाग्य आज गोंदिया येथून गुरू पिठाधिश्वर ऋितेश्वर महाराज यांच्या दर्शनाने तसेच त्यांच्या अमृतवाणीतून हनुमंत कथेच्या श्रवणाने प्राप्त झाले आहे. यासाठी मी या कार्यक्रमाचे यजमान खासदार प्रफुल पटेल व त्यांच्या धर्मपत्नी सौ. वर्षाताई पटेल यांचे आभार मानतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २२ डिसेंबर रोजी हनुमंत कथा पाठ कार्यक्रमात व्यक्त केले.


गोंदिया येथील धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात हनुमंत कथा पाठचे आयोजन करण्यात आले आहे. आज कथेचा दुसरा दिवस होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कथा श्रवणाच्या अनुषंगाने गोंदियात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरू ऋतेश्वर महाराज यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्राच्या भूमिवर आपण हिंदू धर्मियांना योग्य संदेश देत आहात, असे बोलत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, आमदार विनोद अग्रवाल, आ. डॉ.परिणय फुके, मा.आ. राजेंद्र जैन, आ. राजु कारेमोरे, आ. संजय पुराम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. महाराजांच्या आशिर्वाद व दीप प्रज्वलनानंतर कथेला प्रारंभ झाले. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या हनुमंत कथा कार्यक्रमात हजारोच्या संख्येत धर्मप्रेमी सहभागी होत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments