गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी शनिवारी गोंगले येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. क्षेत्राच्या विकासासाठी आ.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या पाठपुराव्याने ३ कोटी १७ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला असून या निधीतून विविध विकासकामे केली जाणार आहेत.
गोंगले या गावात आमदार स्थानिक विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा व एकलव्य पुतळ्याजवळ सौंदर्यकरण, ५ लक्ष, काल्हा देव मंदिराजवळ सभागुह चा लोकार्पण १0 लक्ष, ग्रामस्थांच्या मागणीवरून बांधलेल्या अंगणवाडी खोली चा लोकार्पण १0 लक्ष, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत गोंगले ते बक्कीटोला रस्ता वर पुल १ कोटी ४९ लक्ष रू लोकार्पण तसेच गोंगेले/ पैकनटोली, बक्कीटोला, भोयरटोला येथे जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ४३ लक्ष रुपयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन केला.
भूमिपूजन कार्यक्रमाला संबोधित करताना आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी ग्रामपंचायत गोंगले यांचे कौतुक केले. गावात विविध बांधकामे केल्यास गावकर्यांची व परिसरातील नागरिकांना सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रंसगी जिल्हा परिषद सदस्या सुधाताई रहांगडाले, सरपंच शामकला करचाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव डी.यू.रहांगडाले, माजी सरपंच विश्वनाथ रहांगडाले, मोरेश्वर राऊत, भोजराज रहांगडाले, तुळशीराम बिसेन, माणिकचंद रहांगडाले, संगीता रहांगडाले, मदन येळे, आशा कृपान, मनीषा कृपाले, नरेश केवट, बालू गजबे, उषाताई रहांगडाले, साहिल बीसेन, प्रशांत येळे, शैशराम पटले, प्रमिला वैद्य, विमला भेलावे,तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
गोंगले येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
RELATED ARTICLES