Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोंदियातील मातीत पिकविली लालबुंद स्टॉबेरी

गोंदियातील मातीत पिकविली लालबुंद स्टॉबेरी

गोंदिया : माहिती प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्या वतीने नुकतेच प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ह्यह्यमल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनह्णह्ण कार्यक्रमात कृषि विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. सदर स्टॉलमध्ये तृणधान्य सोबत संजय जसारी, मु.चारगाव, ता.जि.गोंदिया यांच्या शेतातले लालबुंद स्टॉबेरी स्टॉलवर ठेवण्यात आलेली होती.
सदर स्टॉबेरी पाहूण जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या सहायक संचालक निकीता जोशी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी स्टॉबेरीची चव चाखूण गोंदियातील मातीत सुध्दा स्टॉबेरी होऊ शकते. याबाबत आश्चर्य व्यक्त केले. संजय जसाणी मु.चारगाव हे उद्योजक असून त्यांना शेतीची खुप आवड आहे. ते आपल्या बाविस एकर शेतात भाजीपाला लागवडीसोबतच स्टॉबेरी, ड्रॅगन फ्रुट इतर फळ पिकासारखे नवनविन लागवडीचे प्रयोग कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतात करीत असतात. त्यांनी यावर्षी नव्यानेच 20 आर जागेत 5 बाय 1 फुट अंतरावर 4500 स्टॉबेरी रोपांची लागवड केली आहे. त्यापासून त्यांना उत्पन्न सुरु असून 200 ग्रॅमच्या डब्याची पॅकींग करुन 80 ते 100 डब्याची विक्री गोंदियाच्या बाजारात करीत आहे. स्टॉबेरीचे 1.5 टन पर्यंत उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. याबरोबरच पुढील वर्षी स्टॉबेरी क्षेत्राचे विस्तार करण्याची इच्छा व्यक्त करुन कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनाबाबत आभार मानले.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments