नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक
गोंदिया : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, 30 जानेववारी रोजी गोंदिया गोंदिया जिल्ह्यात सकाळी 8 वाजतापासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदान शांततेत सुरु असून दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 57.18 टक्के मतदान झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
या निवडणुकीत एकूण 22 उमेदवार निवडणूक लढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 18 मतदान केंद्रांवर मतदान सुरु असून सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत 35.66 टक्के मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 43 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्ह्यात दुपारी 12 वाजेपर्यंत 29.82 टक्के मतदान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात 12 मतदान केंद्रांवर मतदान होत असून दुपारी वाजतापर्यंत 36.48 टक्के मतदान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 10 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्ह्यात दुपारी 2 वाजतापर्यंत 57.18 टक्के मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात 14 मतदान केंद्रावर मतदान होत असून दुपारी 12 वाजतापर्यंत 39.80 टक्के मतदान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 27 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे या जिल्ह्यात 42.19 टक्के मतदान झाले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होत आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219