गोंदिया। पोलीस स्टेशन गंगाझरी येथे नेमणुकीस असलेले दिवंगत पोलीस अंमलदार हुबलाल पुणाजी अंबुले यांचे दिनांक – १८/०२/२०२१ रोजी गोंदिया ते तिरोडा रस्त्यावरील रामानी लॉन जवळ दुचाकी मोटार सायकल ला टिप्परची धडक लागून त्यात जखमी होवून घटनास्थळीच त्यांचे अपघाती निधन झाले होते.
त्या अनुषंगाने संचालक विमा संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडुन ” राज्य शासकिय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने” अंतर्गत रु. १०,००,०००/- मंजुर करण्यात आले आहे.
आज दिनांक १५/१२ /२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या शुभहस्ते नामनिर्देशित व्यक्ति लाभधारक म्हणुन श्रीमती सविता हुबलाल अंबुले यांना विमा दाव्याची रक्कम रु. १०,००,०००/- चे “प्रतिकात्मक धनादेश” वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. देवीदास कठाळे, वरिष्ठ श्रेणी लिपीक श्रीमती- प्रणिता लांजेवार, पो. हवा. राज वैद्य, राजू डोंगरे उपस्थित होते.