खा. सुनील मेंढे यांच्या पाठपुराव्याला यश
गोंदिया : खा.सुनील मेंढे यांच्या सततच्या मागणी नंतर “जबलपूर गोंदिया जबलपूर” पॅसेंजर १७ एप्रिल पासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. खा.सूनील मेंढे यांनी गोंदिया रेल्वे स्थानका वर ह्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला, ही गाडी सुरु झाल्याने नैनपूर, बालाघाट इ. गावातील लोकांना सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोरोना महामारीच्या काळात बंद झालेल्या दोन पॅसेंजर रेल्वे गाड्या २४ एप्रिल पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. ह्या गाड्या मागील दोन वर्षापासून बंद असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. या मध्ये इतवारी बालाघाट मेमो, गोंदिया इतवारी मेमो गाड्यांचा समावेश होता. खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही सेवा पूर्ववत होत आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांची चांगली तारांबळ उडाली होती. अनेक दिवसांपासून प्रवाशांची या गाड्या सुरू करण्याची मागणी होती. दरम्यान प्रवाशांची गरज लक्षात घेता खासदार सुनील मेंढे यांनी या गाड्यांची सेवा पूर्ववत होणे किती आवश्यक आहे हे पटवून दिल्यानंतर रेल्वे शासनाने पुन्हा एकदा या दोन्ही गाड्या नियमित सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 एप्रिल पासून या दोन्ही गाड्या धावणार असून प्रवासांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. गाड्या नियमित सुरू करण्यासाठी नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार सुनील मेंढे यांचे आभार मानले आहेत.
गोंदिया जबलपूर पॅसेंजरचा शुभारंभ तसेच कोरोना काळात बंद झालेल्या 2 पॅसेंजर गाड्या 24 पासून पुन्हा सुरू
RELATED ARTICLES