Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया जिल्ह्यात 10 लाख 85 हजार 272 मतदार : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

गोंदिया जिल्ह्यात 10 लाख 85 हजार 272 मतदार : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

मतदारांनी आधार क्रमांकाची मतदार ओळखपत्राशी जोडणी करावी
1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित यादी प्रसिद्ध
गोंदिया जिल्ह्यात 10 लाख 85 हजार 272 मतदार
महिला मतदाराच्या संख्येत वाढ
गोंदिया : 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात 5 लाख 37 हजार 969 पुरुष मतदार, 5 लाख 47 हजार 293 स्त्री मतदार व ईतर 10 असे एकूण 10 लाख 85 हजार 272 मतदार आहेत. मतदार यादीत महिला मतदारांची संख्या अधिक असून गोंदिया जिल्ह्याचे स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाण 117 आहे अशी माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणी ऐच्छिक असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आधार क्रमांकाची मतदार ओळ्खपत्राशी जोडणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. उपजिल्हाधिकारी निवडणूक किरण अंबेकर व नायब तहसीलदार आप्पासाहेब व्हनकड यावेळी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील 63 अर्जुनी मोरगाव, 64 तिरोडा, 65 गोंदिया व 66 आमगाव विधानसभा मतदार संघातील 1284 मतदान केंद्रावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार ६३-अर्जुनी मोरगाव मतदार संघात पुरुष मतदार 1 लाख 26 हजार 590, स्त्री मतदार 1 लाख 26हजार 249 एकूण मतदार 2 लाख 52 हजार 839, 64-तिरोडा मतदार संघात पुरुष मतदार १ लाख २९ हजार ३६७, स्त्री मतदार १ लाख ३३ हजार २९६ एकूण मतदार २ लाख ६२ हजार ६६३, ६५-गोंदिया मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ५१ हजार ५०८, स्त्री मतदार १ लाख ५७ हजार ४६८ इतर ०९ एकूण मतदार ३ लाख ०८ हजार ९८५ व ६६ आमगाव मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ३० हजार ५०४, स्त्री मतदार १ लाख ३०२८० व इतर ०१ असे २ लाख ६० हजार ७८५ मतदार असे चारही विधानसभा मिळून एकूण १० लाख ८५ हजार २७२ मतदार आहेत आहेत. जिल्ह्यात ६३-अर्जुनी मोरगाव ३१८, ६४-तिरोडा २९५, ६५-गोंदिया ३६१ व ६६-आमगाव ३१० असे एकूण १२८४ मतदान केंद्र आहेत. १ जानेवारी २०२४ अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २७ ऑक्टोबर २०२३ ते ०५ जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण २१००३ नव मतदारांची नोंदणी करण्यात आली असून त्यात १८-१९ वयोगटातील १४६३१ मतदार आहेत. सदर संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित व दुबार मतदार अशा स्वरूपाच्या ३८ हजार ७७२ मतदारांची नवे वगळण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्यात १ऑगस्ट २०२२ पासून मतदान यादीतील मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्याची मोहिम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १० लाख ८५ हजार २७२ मतदरांपैकी ६ लाख ८६ हजार ८३६ मतदारांनी आधार लिंक केले आहे. याची टक्केवारी ६३.२९ टक्के आहे. मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणी ऐच्छिक असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आधार क्रमांकाची मतदार ओळ्खपत्राशी जोडणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. त्यासाठी वोटर हेल्पलाईन अँपचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले.

२५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस
२५ जानेवारी गुरुवारी जिल्हाभरात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. धावपटू मुन्नालाल यादव हे जिल्ह्याचे मतदार दूत म्हणून नियुक्त केले आहेत. त्यांचा सत्कार मतदार दिवशी करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नवं मतदारांना छायाचित्र ओळखपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. असे विविध कार्यक्रम मतदार दिवशी आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments