Tuesday, May 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया जिल्ह्यात 55 टक्के जागांवर भाजपचे वर्चस्व, माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी निवडून...

गोंदिया जिल्ह्यात 55 टक्के जागांवर भाजपचे वर्चस्व, माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी निवडून आलेल्या सर्व सरपँच, ग्रापं सदस्याच्या केला अभिनंदन

 

गोंदिया.(20डिसें.) आज गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीच्या निकालावर भाजपमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून 55 टक्के जागांवर भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत.

गोंदियात भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी निवडून आलेल्या सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करून सर्वांच्या अथक परिश्रमामुळे, शासनाच्या सकारात्मक उपक्रमामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्याकडून गावपातळीवर विविध विकास कामांचे नियोजन, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीकडे शासनाचे लक्ष वेधणे, बोनसच्या विषयावर शासनाची सकारात्मक पावले उचलणे. भातशेती, ग्रामीण भागाचा विकास.कोविडमध्ये नागरिकांसाठी तत्परतेने जनकार्य, आणि निधी च्या नियोजन, व राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने गावांच्या विकासाला दिलेल्या प्राधान्याच्या जोरावर आज जनतेने भाजपवर विश्वास प्रस्थापित करून भाजपला मोठा विजय मिळवून दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments