माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नांना यश
गोंदिया : शहरातील नेहरू चौक येथे नगर विकास विभाग, नगर परिषद अंतर्गत “अहिंसा परमो धर्म” भव्य अहिंसा द्वार बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम मा. ना.पालकमंत्री श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या शुभहस्ते पार पडले.
खा.श्री प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नांना यश मिळून अहिंसा द्वार करीता निधी उपलब्ध होऊन स्थानिक नेहरू चौक येथे अहिंसाद्वार (गेट) उभारण्याच्या कामालाही मंजुरी प्रदाण करण्यात आली आहे. गोंदिया शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी खा. श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन व शहरातील ०३ उडाणपुलाचे भूमिपूजन लवकरच होईल असे आश्वासन पालकमंत्री श्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.
भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री मा.ना.धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, संजय जैन, राजू एन जैन, हिरेश जैन, बसंत जैन, देवेंद्र अजमेरा, निखिल जैन, अक्षय जैन, सुरेंद्र जैन, सुनील मामा, अन्नी जैन, संदीप लाडली ,अनिल जैन, पीयूष जैन, जिंकी जैन, नवीन जैन,अतुल, हर्ष,संकल्प, सुनील मधुलिका, राजेश जैन, सुनील टनटू, नितिन जैन, संदीप जैन, सनी, अमन पाटनी, सुरेंद्र बलराम, आशीष जैन,अनिल न्यू दिल्ली,संजय पप्पी, नीरज जैन, अशोक सहारे, नानू मुदलियार, विनीत सहारे, रफिक खान, सतीश देशमुख, हेमंत पंधरे, केतन तुरकर, रवी मुंदडा, खालिद पठाण, राजेश वर्मा, विशाल शेंडे, जयंत कछवाह, मनोहर वालदे, माधुरी नासरे, कुंदा दोनोडे, तुषार ऊके, राहुल वालदे, एकनाथ वहिले, सुनील पटले, हरबक्ष गुरणानी, शैलेश वासनिक, कपिल बावनथडे, नागो बनसोड, लखन बहेलिया, अमोल बेलगे, लव माटे, दर्पण वानखेडे, रौनक ठाकूर, अविनाश महावत, शरभ मिश्रा, नरेंद्र बेलगे, सहित मोठ्या संख्येने समाजबंधू व शहरवासीय उपस्थित होते.